भिंगार / प्रतिनिधी
येथील भीमा गौतमी विद्यार्थिनीनी आश्रम येथे 'हेल्प देम ग्रुप' व नगर तालुका पोलीस ठाणे यांच्यावतीने महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजात राहत असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून भिंगार येथील हेल्प देम ग्रुपने भीमा गौतमी आश्रमातील विद्यार्थिनींना स्नेहभोजन देण्यात आले.
त्यांना शालेय व जीवन उपयोगी वस्तुंचे वाटप करत एक अनोखा उपक्रम राबवून एक आदर्श निमार्ण करून विद्यार्थिनींसोबत महिलादिन साजरा करण्यात आला. अनाथ आणि निराधार विद्यार्थ्यांना आधार बनून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार कमी लोक कार्यरत आहेत. अशा अनाथ निराधार मुलांच्या पालन पोषण,शिक्षण यासाठी पुढील काळातही मदत करणार असल्याचे नगर तालुका पोलिस ठाण्याचे स. पो. नि. शंकर सिंग राजपूत यांनी सांगितले. यावेळी नगर तालुका पोलीस स्टेशनचे संभाजी ढेरे, जयश्री पुंडे, राजश्री चोपडे, अर्चना रासकर, हेल्प देम ग्रुप भिंगारचे शुभम शेरकर, अक्षय मेढे, राहुल डाके, शुभम जाधव, सुमित गुप्ता, संतोष आंग्रे, ओमकार फिरोदिया, शुभम भोसले आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनीना सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देण्यात आली. भीमा गौतमी आश्रमाच्या मुख्याध्यापिका रजनी जाधव यांनी हेल्प देम ग्रुप आणि तालुका पोलिस ठाण्याचे आभार मानले.