हिंगणघाट ते ऑरेंज सिटी रुग्णालय : फुलराणीवरील उपचारक्रम







गेल्या सात दिवसांपासून ४० टक्के जळालेल्या फुलराणीवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते



दिव्य मराठी


Feb 11,2020 08:09:00 AM IST

नागपूर : हिंगणघाटच्या फुलराणीचा संघर्ष अखेर सोमवारी थांबला. शोकाकुल वातावरणात सायंकाळी पाच वाजता तिच्यावर दारोडा या तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून ४० टक्के जळालेल्या फुलराणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी अखेर मृत्यूने तिला गाठले.


हिंगणघाट ते ऑरेंज सिटी रुग्णालय : फुलराणीवरील उपचारक्रम



  • ३ फेब्रुवारी : सकाळी साडेनऊला रुग्णालयात दाखल, सुरुवातीला बर्न ड्रेसिंग करण्यात आले. त्यानंतर गळ्याला छिद्र करून प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी ट्रकॅस्टोमी प्रक्रिया पार पाडण्यात आली.

  • ४ फेब्रुवारी : फुलराणीला औषधांचा पुरवठ्यात वाढ. जंतूसंसर्गाशी संबंधित विविध चाचण्या पार पाडण्यात आल्या. जळालेल्या चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचे जेल लावण्यात आले.

  • ५ फेब्रुवारी : जळालेल्या भागातील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी इशस्कॅरेटोमी प्रक्रिया, जखमा निर्जंतुक करण्यासाठी डिब्राइडमेंट प्रक्रिया आणि थांबलेला रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी तसेच हातांवरील सूज कमी करण्यासाठी हाता-पायांना चिरे देऊन फॅशियाटॉमी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली.

  • ६ फेब्रुवारी : जंतुसंसर्ग होण्याची भीती लक्षात घेऊन अँटिबायोटीक औषधांमध्ये वाढ करण्यात आली.

  • ७ फेब्रुवारी : अतिदक्षता विभागातून शस्त्रक्रिया कक्षात. नाकाद्वारे पोटात द्रवरूप अन्न पुरवठ्यासाठी राईल्स ट्यूब (पोषण नलिका) टाकण्यात आली. द्रवरूप अन्नामध्ये शहाळ्याचे पाणी, सोयामिल्क, ताज्या फळांच्या ज्यूसचा समावेश होत. बर्न ड्रेसिंग करण्यात आले. व्हेंटिलेटर लावले.

  • ८ फेब्रुवारी : रक्तदाबामध्ये बरेच चढ- उतार दिसून आले. त्यामुळे रक्तदाब सामान्य करणारी इंजेक्शन्स देण्यात आली.

  • ९ फेब्रुवारी : जळालेल्या भागातील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी इशस्कॅरेटोमी प्रक्रिया, जखमा निर्जंतुक करण्यासाठी डिब्राइडमेंट प्रक्रिया आणि थांबलेला रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी व हातांवरील सूज कमी करण्यासाठी हाता-पायांना चिरे देऊन फॅशियाटॉमी शस्त्रक्रिया.

  • १० फेब्रुवारी : पहाटे प्राणवायूचा पुरवठा होत नसल्याने व्हेंटिलेटरचे सेटिंग वाढवण्यात आले. प्राणवायू व रक्तदाब नियंत्रणासाठी ३० ते ४० इंजेक्शन्स दिली गेली. दोनदा ह्रदय विकाराच्या झटक्यानंतर कार्डियाक मसाज आणि इंजेक्शन्स. मात्र, फुलराणीला वाचवण्य